Mar
18
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अर्थात ‘व्हॅट’मध्ये करवाढ सुचवणार्‍या अध्यादेशावरून आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारचे वाभाडे काढले. असा अध्यादेश काढण्याचा अधिकारच सरकारला नाही. विधानसभा अध्यक्ष दिलीफ वळसे-फाटील यांनी अध्यादेशाच्या घटनात्मक वैधतेबाबतचा निर्णय राखून ठेवला असून उद्या ते काय निर्णय घेणार यावर करवाढीचे भवितव्य ठरणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर भाषणाची प्रत दुपारी विधानसभेत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली आणि अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाचा प्रस्तावही मांडण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी ‘व्हॅट’संदर्भातील कर सुधारणा अध्यादेश मांडला. 10 मार्च 2010 रोजी काढलेल्या या अध्यादेशाद्वारे व्हॅट दरात 4 ऐवजी 5 टक्के अशी 1 टक्क्याने वाढ करण्यात आली परंतु 2005 ला व्हॅट लागू झाला. हा कायदा फक्त दोन वर्षांसाठी होता. 2007 नंतर त्यात बदल करण्याचा वा अध्यादेश काढून वाढ करण्याचा अधिकारच सरकारला नाही. हा अध्यादेश काढून सरकारने कापड आणि साखरेवर कर लावला पण आपली चूक लक्षात येताच ही करवाढ 17 मार्चला शुद्धिपत्रक काढून मागे घेतली. मुळात अधिकार नसताना अध्यादेश काढला. त्यानंतर करवाढ केली व मग ती पुन्हा मागे घेतली. सरकारचे डोके तरी ठिकाणावर आहे काय? 18 मार्चपासून अधिवेशन सुरू होणार हे माहीत असतानाही 10 दिवस अगोदर सरकार अशा कायद्याची चौकट मोडून अध्यादेश काढतेच कसे? अध्यादेशावरच कामकाज चालवायचे तर मग अधिवेशनाला अर्थच काय? सभागृहाला गृहीत धराल तर आम्ही या प्रश्‍नावर हक्कभंग आणू,
Tags : No Tag Comments : 3 Comment Write Comment
Feb
8
राज्यातील सर्व महापालिका सक्षम करण्यासाठी त्यांना कायद्याने अमर्यादित अधिकार बहाल केले आहेत. महापालिकेच्या कामकाजाबद्दल थेट आदेश देता येईल, असा नियामक आयोग नेमण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. हा आयोग नेमला गेल्यास सध्याचे महापालिकेचे योजना राबविण्याचे अधिकार, नगरसेवकांना विकासकामे करण्यावर बंधने येणार आहेत. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे नागरिकांना कामे करून घेण्यासही बंधने येतील. त्यामुळे हा आयोग नेमला जाऊ नये, यासाठी पक्षभेद विसरून सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी कडाडून विरोध करणे आवश्यक आहे.
Tags : No Tag Comments : 0 Comment Write Comment
Oct
28
Dear Goregaon residents,जय महाराष्ट्र!Thanks for your support throughout. Together now we will make our dream of 'माझे गोरेगाव - मुंबईची शान' true.Keep on giving me your suggestions and messages thru www.subhashdesai.com.Regards.
Tags : No Tag Comments : 1 Comment Write Comment
Aug
29
जय  महाराष्ट्र !  Jai  Maharashtra !Thanks for visiting my blog. The main reason behind this blog is that I can be in touch with you all people on regular basis and know in a better way what you expect from me and my party. I trust that this blog will certainly prove to be a strong link between you all and me as well as my party SHIVSENA. Do keep me posted about your problems, your expectations and your suggestions for making our social life more joyful and less miserable.Do visit my site www.subhashdesai.com and also let me know what betterment you want on this site which will make me in a better position to use this strong media of Internet for our overall betterment.
Tags : No Tag Comments : 35 Comment Write Comment